विविध ग्लोबाल कंपनीत केमिकलच्या बाधने एक कामगार अत्यावस्थ.

 

"तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरुच कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर"

 

तारापूर: दि. 3, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. विविध ग्लोबल इंड्रस्ट्रिज लि. प्लाट नंबर डी 27/1 या केमिकल कारखाण्यात काम करणारा कामगार जगन्नाथ बेठा वय - १९, रा. भिमनगर, बोईसर, हा दि. 2 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या सह्याने पाईप कटिंगचे काम करत असताना गॅस कटिंग पाईप तटून केमिकल मिश्रित गरम पाणी असलेली पाईप लाईन तुटल्याने पांढऱ्या रंगाचे केमिकल मिश्रित गरम पाणी भरलेला पाईप फूटून याच्या पाठीवर हे केमिकल पडल्याने गंभीररित्या भाजला आहे.सल्फो टोबिस असिड या केमिकलची उत्पादन प्रक्रिया सुरु असताना ओलियम या  केमिकलची पाईप लाईन फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारावर बोईसर एमआयडीसीतील तुंगा हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान कंपनी व्यवस्थापणाने पिडीत कामगारावर दबाव टाकून व आमिष दाखवून "माझ्याच चुकीमुळे हा अपघात झाल्याने माझी कोणा विरुद्ध ही काही तक्रार नसल्याचा व केमिकल ऐवजी गरम पाणी पडल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे."

यामुळे कंपनी मालक व व्यवस्थापण हे प्रकरण दावाण्याचा प्रयत्न करित असल्याने इतर कामगार व परिसरातील लोक आणि पर्यावरणाची सुरक्षा विचारात घेता या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अनेक कामगार संघटना व स्थानिकांनी केली आहे.