आरती ड्रग्ज स्फोटात दोन कामगार जखमी

"आरती ड्रग्ज उद्योग समूहात १० दिवसात दुसरी दुर्घटना" औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग व अग्नि शमन दलासह संबंधीत विभागांना माहिती देण्यास जानिवपूर्वक टाळाटाळ...

तारापूर: दि. २३, आरती ड्रग्ज लि. या केमिकल व बल्क ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या कारखाण्यात काल दि.२२ रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत. आरती ड्रग्ज लि. उद्योग समूहाच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाट नंबर एन १९८, या कारखाण्यात केमिकलचे उत्पादन प्रक्रिया सुरू असताना आचानक स्फोट होऊन आग लागली. यावेळी या ठिकाणी कामावर असलेले आँपरेटर प्रदीप पाटील व शांताराम जाधव हे दोघे जखमी झाले आहेत. तांच्यावर बोईसर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

कारखाण्यातील कामगरांच्या सावधगिरीमुळे व हिमतीने  आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु या स्फोटाची माहिती अग्निशमन दलाला व स्थानिक पोलिसांना देण्यात देण्यात आली नव्हती सोशल मिडीयावर याची चर्चा सुरु झाल्यानंतर उशीराने याची माहिती अग्निशमन दलास व पोलिसांना मिळाल्याचे समजते.

याच आरती ड्रग्जच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाट नंबर जी ६० या कंपनीत १० दिवसांपूर्वीच दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास संजय सोनी ४५ या कामगाराच्या अंगावर रियाक्टर मधील केमिकल पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर तुंगा हॉस्पिटल एमआयडीसी तारापूर येथे उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

कंपनी व्यवस्थापना कडून या दोन्ही दुर्घटनाची माहिती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सोशल मिडीयामुळे हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्याने तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या दुर्घटना व आरती ड्रग्ज लि. सारख्या नामांकित व तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळपास १५ कारखाने व टिमा व सीईटीप मधे वर्चस्व असलेल्यांकडू नियम कायदे व कामगार सुरक्षेचे वाभाडे काढले जात असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.