पालघर जिल्हा पोलीसांचे मोबाइल आऊट ऑफ सर्विस ... 

पालघर : (BTM ऩ्यूज नेटवर्क) दिनांक : 06, तारापूर अणु उर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक क्षेत्र, #कोरोना महामारी मुंबई - अहमदाबाद महार्गावरिल रोजचे अपघात, गडचिंचले सारख्या घटना आशा एक ना अनेक समस्यांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या पालघर जिल्हा पोलीसांचे पोलीस अधीक्षक कार्यालय ते 17 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व ठाणे अमलदार यांचे शासकीय मोबाइल ऩंबरवर संपर्कत होत नसल्याने जिल्हातील अनेक नागरिकांचा मागील 4 दिवसांपासून संपर्कच तुटला आहे. 

पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, ठाणे अमलदार व पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांना मागील तीन वर्षापासून आयडीया कंपनीने सिम व मोबाइल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचारी बदलले तरी संपर्क क्रमांक तोच व तिथेच राहत असल्याने नागरिकांना हे अधिक सोयीचे झाले होते. यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांचे खाजगीतील संपर्क क्रमांक नाहित तर बीएसएनएल ची लॉडलाईन सुविधा अनेक पोलीस स्टेशनमधून केंव्हाचीत तडीपार करण्यात आली आहे. 

या सर्व मोबाइलचे बील न भरले गेल्याने कंपनीने या सर्व मोबाइल्सची इन कमिंग व आऊटगोइंग सेवा बंद केल्याचे समजते. बील भरण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निधीच नसल्याने मागील दोन ते तीन महिन्यांपासून अध्याप या मोबाइल्सची बीले भरली नसल्याने पालघर जिल्हा पोलीस ऑऊट ऑफ सर्विस झालेत तर नागरिकांना मोठ्या ञासाला समोर जावे लागत आहे. 

हि समस्या कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.