वांद्री धरण उजवा कालवा बांधकामात भ्रष्टाचार ...

 

"आपले ठेवा झाकुण दुसऱ्याचे बघा वाकुण" पालघर व ठाणे जिल्हात सरकारी बांधकामात झेंडा लावण्यासाठी स्वत: भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम करित असून दुसऱ्या ठेकेदारांच्या कामाबाबत आंदोलने नाटक करित असल्याचा आरोप जिजाऊ कंष्ट्रक्शनच्या निलेश सांबरेंवर मनसेने केला आहे.

 

मनोर : दि. 03 सप्टेंबर, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीचे ज्वलंत भ्रष्ट उदाहरण म्हणजे वांद्री धरण उजवा कालवा - मनसे

 

जिजाऊ कंस्ट्रक्शनचे मालक व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे "स्वत: चे ठेवा झाकुण दुसऱ्याचे बघा वाकुण" या प्रमाणे पालघर व ठाणे जिल्हातील शासकीय कामे, विशेषत: रस्ते व इतर बांधकाम करणाऱ्या करणाऱ्या ठेकेदारांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत आंदोलनाचा दिखावा करित असल्याचा आरोप मनसेने केला आहे. आंदोलनकर्त्याचे घोंगडे पांघरु पाहणारे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे वांद्री धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी केलेल्या वांद्री धरणाच्या उजव्या कालव्याचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने ऐन पावसाळ्यात हे बांधकाम जमीनदोस्त झालेले आहे. 

 

 

"वांद्री धरणाच्या उजव्या कालव्याच्या दुरुस्ती अंतर्गत मागील वर्षी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये उजव्या कालव्याची 35 मीटर लांबीची भिंत कोसळली आहे. या बांधकामाच्या दर्जाबाबत अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कालव्याच्या काँक्रीटीकरणाचे तक्रारी व आरोप केला होता. परंतु निलेष सांबरेंच्या कंपनीचा ठेका असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप होत आहे. वांद्री धरणाच्या कालव्यांतून दुबार पिकासाठी सुमारे दोन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात एक हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यात आले आहे. आशा परिस्थितित कालव्यांतून पाण्याची गळती वाढल्याने धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात अत्यल्प प्रमाणात पोचत आहे. 
त्यामुळे दुबार पिकातून मिळणारे उत्पन्नात घट झाली असून, धरण निर्मिती नंतर पस्तीस वर्षांनी कालव्यांच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध झाला होता, यात ही जिजाऊने चुना लावल्याने त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर भ्रष्टाचाराचे सांबर फिरले आहे.

पाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी रक्ता समान, या कोरोनाच्या संकटात उद्योग धंदे-बंद असताना, फक्त शेतकरी काम करत होता म्हणून, कोरोनाच्या संकटाला मानवी जीवन सुरळीत चालू होते व आहे. परंतु ठेकेदार व पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी संगणमत स्वतच्या अर्थिक फायद्यासाठी  कालव्यांच्या कामाचा दर्जा अतिनिकृष्ट केल्याचा आरोप मनसेनेे केला आहे. 

बांधकाम विभागातील अधिकारी पगार घेतात सरकारचा  काम मात्र निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीसाठी करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.  

या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मनसे शासन दरबारी पाठपुरावा करणार असून, या प्रकरणी पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारांची  प्रत्यक्ष भेट घेऊन या कामातील भ्रष्टाचाराची तक्रार करणार असल्याचे मनसे कडून सांगण्यात आले आहे.  

वांद्री धरणाच्या कालव्यांच्या कामाच्या दर्जाची तपासणी करावी. काँक्रीटीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे आढळल्यास सर्व कामे नव्याने करावीत या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांच्याकडे केली आहे. तसेच आंदोलनाचा इशारा हि दिला आहे.

या शिष्टमंडळात मनसे तालुका अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत,मंगेश बोरकर, गणेश घोलप, नितीन घोलप,नित्यानंद पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या संदर्भात हजारो शेतकऱ्यांनी मनसे कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. परिणामी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, पालघर तालुका अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, मनसेचे मनोर विभागाचे गणेश घोलप, मंगेश बोरकर विभाग अध्यक्ष नित्यानंद पाटील, ललितेश संखे, शिवा यादव, कुणाल कुंटे, ग्रामपंचायत सदस्य जयेश आहाडी, धवल आशर, सतेंद्र मिश्रा इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पालघर पाटबंधारे विभाग मनोरचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांना सोबत घेऊन सरळ वांद्री धरण गाठून तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली असता, शासनाचा करोडो रुपयांचा निधी जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या भ्रष्ट आणि दर्जाहीन कामामुळे वांद्री धरणात वाहून गेल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.