चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ ... 

तारापूर : दिनांक- 26 ऑगस्ट तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ओपन स्पेस एएम 1 या खुल्ल्या मैदानातील वाढलेल्या झाडीत सोडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवरत्न रॉय (शिवम) वय 18 वर्ष असे मयत युवकाचे नाव असून, याच वर्षी इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. 

शनिवार दि. 22 रोजी राञी 9 वाजताच्या सुमारास रोशन गँरेज गल्ली अवधनगर येथिल राहत्या मोबाइल वरती घरी पबजी खेळत असताना मिञाने बाहेर बोलावले, Karamtara मोबाइल घरीच ठेऊन मिञला भेटायला गेलेला शिवम परत आलाच नाही. याबाबत बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनला काल उशीराने मिसिंग कंम्पलेंट दाखल करण्यात आली होती. माञ आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गंगोञी हॉटेल समोरील खुल्ल्या मैदानातील वाढलेल्या झाडीत शिवमचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून सर्व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

बोईसर पोलीस व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. वळवी घटनास्थळी दाखल झाले असून पुढिल तपास व कारवाई सुरू आहे.