भिषण अपघातात माजी नगरसेवक व पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानीया यांचा मुलाचा दुर्दैवी मृत्यु. 

पालघर : दि. 21, मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दितील दुर्वेस सायल्टंला रिसोर्ट जवळ  आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास, वैतरणा नदिवरील पुलाच्या कठड्यावर इनोव्हा कार धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात कार चालक ओवेस लुलानीया वय 21, याचा जागीच मृत्यु झाला आहे.  मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर जोरात आदळी हा अपघात इतका  भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला, कार काढण्यासाठी दोन क्रेनची मदत घ्यावी लागली. मयत ओवेस लुलानीया पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक व पालघर नागरिक या साप्ताहिकाचे संपादक जावेद लुलानीया यांचा मुलगा होता.