MIDC च्या नियमबाह्य भूखंड वाटपाने बोईसर व परिसरात पूर परिस्थिती 

बोईसर : दिनांक- 05 ऑगस्ट 2020, मागील 7 ते 8 वर्षापासून तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांची विक्री पूर्ण झालेली असल्याने नवीन उद्योग व उद्योग विस्तारासाठी भूखंड शिल्लक नसताना ही सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवुन नियमबाह्यरित्या सोयीस्कर पध्दतीने नियमांमध्ये बदल करत दलालांच्या माध्यमातून अर्थिक हितसंबंधजोपासत राखीव असलेल्या खुल्ल्या प्रवर्गातील जागा व यातून वाहणाऱ्या नैसर्गिक नालेबुजवून याठिकाणी उभारण्यात आलेल्या उद्योगामुळे मागील पाच सहा वर्षापासून बोईसर, सरावली, धोडीपूजा व अवधनगरच्या सखल भागासह जे झोन मधील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरून पुर सदृष्य परिस्थिती निर्माण होऊन लाखो करोडो रुपयांचे अर्थिक नुकसान होते. अनेक वेळा जीवित हानी ही झालेली आहे. 

औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांची रुदी 20 मीटर पर्यंत ठेवण्याचा नियम असताना ही गैर प्रकारे अर्थिक फायद्यासाठी काही उद्योजकांना नाल्यालगत भूखंड दिल्याने या उद्योजकांनी नाले बुजवून उद्योग उभारल्याने सर्व पाणी लोकवस्तीत शिरते व मोठे नुकसान होते. 

याबाबत अनेक नागरिक व समाजीक संस्थांनी तक्रारी देऊन ही याकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या परिणाम स्वरुपी प्रत्येक वर्षी बोइसर व परिसरातील जनतेला पूर परिस्थितीस समोरे जावे लागते आहे. या गंभीर समस्येकडे  ताडीने लक्ष न दिल्यास भविष्यात या ही पेक्षा भंयकर परिस्थितीला समोर जावे लागणार यात शंका नाही.