18 डिसेंबरला तारापूरमध्ये उद्योजकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन. 

तारापूर : आजचे औद्योगिक लिडर आणि उद्याच्या औद्योगिक क्रांतिसाठी प्रयत्नशील नेतृत्व यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी, दि. 18 डिसेंबर 2019 रोजी एमआयडीसी बिझनेस कॉन्क्लेवचे आयोजन, इंड्रस्ट्रियल इन्फोटेक(tarapurmidc.com) यांच्या सहकार्याने टीआयएमए TIMA येथे करण्यात आले आहे. 

विशिष्ट चौकटी बाहेर जाऊन  विचार करणे व व्यवसाय सुरू करणे ही आजची गरज आहे.  म्हणून कॉन्क्लेव्हमध्ये औद्योगिक भागीदारांना एकत्रितपणे आगामी आणि नवीन औद्योगिक रणनीती आव्हानांची माहिती घेण्यासाठी अंतर्दृष्टी प्रदान करण्याची आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी योगदान देण्याच्या संभाव्यतेचा शोध घेण्याचा विचार केला आहे.

एसएमई आणि उद्योजकांना व्यवसाय निराकरणे, नवनिर्मिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम करणे आणि कॉर्पोरेट समस्यांना आव्हान देणे तसेच समाजात मूर्त बदल घडवून आणण्यासाठी व्यापक योजना तयार करणे हा या कार्यक्रमचा उद्देश्य आहे. उद्योगातील विशिष्ट नेतृत्व, दूरदृष्टी, रणनीती आणि बदलत्या व्यवसायाच्या आवश्यकतेची अंतर्दृष्टी असलेल्या विशिष्ट व्यक्तिमत्वांना संधी प्रदान करण्याचा प्रयत्न या व्यासपिठावरून केला जाणार आहे. 

श्री. भावीन शहा, श्री. सी. एन. मूर्ती आणि श्री. अभिनव ठाकूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व अनेक पारितोषिक विजेते असलेल्या तज्ञ व्यवसायाच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. व्यवसाय या नेटवर्किंग आणि उत्पादन शोकेसिंगद्वारे आपल्या व्यवसायास चालना देण्यास मोलाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

अनेक नामांकित कंपन्यांमधील व्यक्ती त्यांचे विचार, अनुभव आणि कल्पना सामायिक करण्यासाठी  हजर राहणार आहेत.

प्रायोजक, प्रदर्शनकर्ता, प्रेक्षक व जाहिरातदार इ. या महा व्यवसायाच्या अधिवेशनात सहभागी होण्याचे जाहिर निमंत्रण व आव्हान करण्यात येते आहे. 

सर्व उद्योग सदस्यांना प्रेरित करून व त्यांना आवश्यक मार्गदर्शन व उपाययोजना उपलब्ध करुन देऊन व्यवसायाच्या आव्हानांवर विजय कसा मिळवावा हे या कार्यक्रमाचा विषय व वैशिष्ट आहे. व्यवसायाचे नुकसान आणि आर्थिक समस्या कमी करण्यासाठी कमीतकमी खर्च व उपाययोजना करण्याच्या दिशेने  वाटचालीचा हा दृष्टीकोन आहे.